महिलांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यासाठी निधी संकलित करण्याच्या उद्देशाने बेळगावमधील विवाहित महिलांसाठी ‘मिस बेळगाव दिवा’ या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे.

लायन्स क्लब बेळगावच्या अध्यक्षा गीता कित्तूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
लायन्स क्लबच्या वतीने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून, आता शहरात महिलांसाठी शौचालय बांधण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी निधी उभारण्याच्या हेतूने ही स्पर्धा आयोजित केल्याचे गीता कित्तूर यांनी स्पष्ट केले.
या स्पर्धेत बेळगावमधील विवाहित महिलांना तीन वयोगटांत सहभागी होता येईल. १० मार्चपर्यंत प्राथमिक फेरीत शारीरिक सुदृढता, कलागुण आणि पाककलेच्या आधारे निवड केली जाईल. २१ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सोहळ्यात रॅम्प वॉक आणि प्रश्नोत्तरांच्या फेरीतून विजेते निवडले जातील. या सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटी परीक्षक म्हणून उपस्थित राहणार असल्याचे गीता कित्तूर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला प्रतिभा मुतालिक, भारती ओडवी, लक्ष्मी कोळकी उपस्थित होत्या.


Recent Comments