बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस विभागाने आता जुन्या अनुभवी आणि कडक अधिकाऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बागलकोट जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक म्हणून यशस्वी कामगिरी केलेले सी.बी. ऋष्यंत आणि अमरनाथ रेड्डी यांना तातडीने बागलकोटला पोहोचण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांचा जिल्ह्याचा दांडगा अनुभव आणि स्थानिक परिस्थितीवर असलेली पकड दंगल सुशमित करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी बागलकोटच्या दिशेने रवाना झाले असून आज रात्रीच ते जिल्ह्यात दाखल होणार आहेत.
शिवजयंती मिरवणुकीवरील हल्ला आणि बाजारपेठ भागात झालेल्या अप्रिय घटनांमुळे सध्या तणावाचे वातावरण आहे. या अनुभवी अधिकाऱ्यांच्या आगमनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कायदा हातात घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


Recent Comments