देव-देवतांच्या भग्न प्रतिमांचे कोणत्याही ठिकाणी देवाचा अवमान करणे हा धार्मिकदृष्ट्या गुन्हाच आहे, असे स्पष्ट मत सर्वलोकसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांनी व्यक्त केले.


शनिवारी बेळगाव शहरातील चन्नम्मा सोसायटी परिसरात उघड्यावर टाकलेल्या अशा भग्न प्रतिमांचे संकलन करून फाऊंडेशनने एक आदर्श उपक्रम राबवला. ज्या नागरिकांना अशा प्रतिमांचे शास्त्रोक्त विसर्जन करणे शक्य नाही, त्यांनी थेट सर्वलोकसेवा फाऊंडेशनशी संपर्क साधावा, आम्ही स्वतः येऊन त्या प्रतिमा सन्मानाने घेऊन जाऊ, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. फाऊंडेशनच्या या अनोख्या सामाजिक आणि धार्मिक कार्याचे संपूर्ण शहरातून कौतुक होत आहे.
या उपक्रमात महादेव राठोड, अरुण आणि श्रीकांत शास्त्री यांच्यासह फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments