Bagalkot

​बागलकोट दगडफेक : जखमी कार्यकर्त्याला बी. वाय. विजयेंद्र यांचा फोन

Share

​बागलकोटमधील दगडफेकीत जखमी झालेले हिंदू कार्यकर्ते प्रकाश अरकेरी यांच्या प्रकृतीची भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी फोनवरून विचारपूस केली.

जिल्हाध्यक्ष एस. टी. पाटील यांच्या माध्यमातून विजयेंद्र यांनी थेट प्रकाश यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

​जखमीची विचारपूस करत विजयेंद्र यांनी कार्यकर्त्याला उपचारांबाबत आश्वस्त केले. या संवादावेळी प्रकाश यांनी आपल्या प्रकृतीची आणि वेदनांची माहिती त्यांना दिली.

​तणावपूर्ण वातावरणात स्वतः प्रदेशाध्यक्षांनी संपर्क साधल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये बळ निर्माण झाले आहे. पक्ष प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुरक्षेसाठी आणि हितासाठी खंबीरपणे उभा असल्याचे संदेश यावेळी विजयेंद्र यांनी दिला. संकटाच्या काळात प्रदेशाध्यक्षांनी घेतलेली ही दखल महत्त्वपूर्ण मानली जात असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष एस. टी. पाटील यांनी दिली.

Tags: