Dharwad

बागलकोटमधील दगडफेकीला राज्य सरकारच जबाबदार

Share

बागलकोट शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीवर झालेली दगडफेक ही हिंदूंच्या भावनेला धक्का लावणारी असून, या हीन कृत्याला राज्यातील काँग्रेस सरकारच थेट जबाबदार असल्याची टीका श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी केली आहे.

बागलकोट येथील घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रमोद मुतालिक यांनी संताप व्यक्त केला. मशिदीजवळ मिरवणूक आल्यावर दगड आणि चप्पलफेक होणे, हा थेट हिंदूंवर केलेला हल्ला आहे. एवढेच नाही तर एका जिल्हा पोलीस अधीक्षकांवरही दगडफेक करण्यात आली, हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यातील काँग्रेस सरकारच्या छुपे पाठबळामुळेच अशा घटना घडत असून या सर्व प्रकरणाला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप प्रमोद मुतालिक यांनी केला.

अशा प्रकारे दगडफेक करणाऱ्या जिहादी प्रवृत्तींना काँग्रेस सरकार खतपाणी घालत आहे. त्यामुळे हिंदू समाजाने आता शांत न बसता अशा लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. या हिंसक कृत्यात सामील असलेल्यांवर सरकारने कोणतीही गय न करता कठोर कारवाई करून त्यांना अद्दल घडवावी, अशी मागणी प्रमोद मुतालिक यांनी केली

Tags: