Belagavi

बबन भोबे मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम

Share

बबन भोबे मित्र मंडळाच्या वतीने बेळगावमधील स्नेहालय मतिमंद मुलांची शाळा आणि समृद्धी फाउंडेशनला जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

गुरु मेडिकलच्या आर्थिक सहकार्यातून हा मदतीचा हात देण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी जपत या विशेष मुलांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे करण्यात आला. यासाठी समादेवी गल्ली येथील गुरु मेडिकल यांच्या देणगीतून साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. याचप्रमाणे समृद्धी फाउंडेशन कंग्राळी या संस्थेलाही साहित्य देण्यात आले.

यावेळी स्नेहालयाचे चेअरमन उदय कलघटकर, गुरु मेडिकलचे संचालक गुरु सुंठणकर, संतोष पुरोहित आणि श्रीनिवास पै यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते या साहित्याचे वितरण करण्यात आले.

मित्र मंडळाचे अध्यक्ष बबन भोबे यांनी प्रास्ताविक तर टी के मंडोळकर यांनी आभार मानले.

Tags: