Belagavi

चलुवेनट्टी गावातील सेवानिवृत्त जवानाचा सत्कार

Share

भारतीय सैन्यात दोन दशकांहून अधिक काळ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या चलुवेनट्टी गावातील संजय अशोक पाटील या जवानाचे ग्रामस्थ आणि माजी सैनिक संघटनांनी भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत केले.

बेळगाव तालुक्यातील चलुवेनट्टी गावचे सुपुत्र संजय अशोक पाटील यांनी भारतीय सैन्यात सलग २४ वर्षे प्रदीर्घ सेवा बजावली असून आज ते निवृत्तीनंतर गावात परतले. देशाच्या विविध सीमावर्ती भागात अत्यंत कठीण परिस्थितीत सेवा बजावून परतलेल्या या जवानाचे गावात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. चलुवेनट्टी गावातील आजी आणि माजी सैनिक संघटनेच्या वतीने संजय पाटील यांच्यासाठी विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना स्थानिक नेत्यांनी संजय पाटील यांच्या धैर्याचे कौतुक केले. संजय पाटील यांच्या या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा देखील मोलाचा वाटा आहे. कुटुंबाने कठीण काळात दिलेल्या पाठिंब्यामुळेच ते यशस्वीपणे देशसेवा पूर्ण करून परतले आहेत, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.

यावेळी गावातील विविध नेतेमंडळी, ग्रामस्थ आणि नातेवाईक उपस्थित होते.

Tags: