Belagavi

​बागलकोट शिवजयंती मिरवणूक दगडफेक : ​श्रीराम सेनेचे उद्या राज्यव्यापी आंदोलन

Share

​बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीवर समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ उद्या श्रीराम सेनेने राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. या घटनेत पोलीस अधीक्षकांसह अनेक शिवभक्त जखमी झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बागलकोट शहरातील पंका मशिदीजवळून शिवजयंतीची मिरवणूक जात असताना काही समाजकंटकांनी अचानक चपला आणि दगडफेक केली. या अनपेक्षित घटनेत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पोलीस कर्मचारी आणि अनेक शिवभक्त जखमी झाले आहेत. राष्ट्रपुरुषाच्या मिरवणुकीवर झालेल्या या हल्ल्यामुळे सार्वजनिक स्तरावर तीव्र संताप व्यक्त होत असून परिस्थिती संवेदनशील बनली आहे.

​या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत श्रीराम सेनेचे प्रमुख रविकुमार कोकीतकर यांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रपुरुषाचा हा अपमान कदापि सहन केला जाणार नाही आणि दोषींना त्वरित अटक झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या कृत्याचा निषेध करण्यासाठी उद्या सकाळी ११ वाजता राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर श्रीराम सेनेच्या वतीने भव्य आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रविकुमार कोकीतकर यांनी दिला.

Tags: