Bagalkot

परिवहन संपाला बागलकोट जिल्ह्यात शून्य प्रतिसाद

Share

थकीत वेतन आणि पगार वाढीच्या मागणीसाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या ‘बेंगळुरू चलो’ आंदोलनाचा कोणताही परिणाम बागलकोट जिल्ह्यावर झाला नसून केएसआरटीसी बस सेवा पूर्णपणे सुरळीत असून प्रवाशांची कोणतीही गैरसोय झालेली नाही.

परिवहन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. मात्र, बागलकोट जिल्ह्यात या संपाला कोणताही पाठिंबा मिळालेला नाही. पहाटेपासूनच जिल्ह्यातील सर्व आगारांतून केएसआरटीसीच्या बसेस नेहमीप्रमाणे वेळापत्रकानुसार बाहेर पडल्या आहेत. बागलकोटमधील नवनगर बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत असून कर्मचारी उत्साहाने आपल्या कर्तव्यावर हजर आहेत.

सध्याच्या परिस्थितीत परिवहन कर्मचाऱ्यांचा हा संप केवळ बेंगळुरू शहरापुरता मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. बागलकोट विभागातील कर्मचारी संपापासून दूर राहिल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. संपाच्या धास्तीने प्रवास रद्द करण्याच्या विचारात असलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळाला असून जनजीवन पूर्ववत आहे. राजधानीत निदर्शने सुरू असली तरी या सीमावर्ती जिल्ह्यात परिवहन सेवा पूर्णपणे सुरळीत सुरु आहे.

Tags: