Chikkodi

चिकोडीत श्री शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Share

चिकोडी शहरातील प्रभुवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती अत्यंत थाटामाटात साजरी करण्यात आली. यावेळी शिवप्रेमींनी मोठी गर्दी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी एसी सुभाष संपगावी, डीवायएसपी गोपाळकृष्ण गौडर आणि मराठा समाजाचे नेते रामा माने व बी. आर. यादव यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ धाडसी आणि पराक्रमीच नव्हते, तर ते एक उत्तम वक्ते आणि संयमी विचारवंत होते. त्यांनी कधीही कोणत्या धर्माचा द्वेष केला नाही किंवा ते एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या सैन्यात सर्व जाती-धर्माचे मावळे खांद्याला खांदा लावून लढत होते,” असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.

शिवजयंतीच्या उत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक करण्यासाठी पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी तहसीलदार राजेश बुर्ली, रामा माने, अनिल माने, बी. आर. यादव, जोतिबा खामकर, अनिल यादव, निवृत्ती माने, विठ्ठल जाधव, सुरेश जाधव, सचिन माने, दत्तू भोसले, आप्पा खामकर, धनाजी जवान, शब्बीर दानवाडे यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: