बेळगावमधील काकती येथील सेंट जॉन्स इंग्लिश मीडियम हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ नेहरू नगर येथील डॉ. बी. एस. जीरगे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी या संपूर्ण सोहळ्याची रंगत वाढवली.


कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य अतिथी डॉ. ज्योती भट्ट, दीक्षा शुक्ला आणि संस्थेचे चेअरमन प्रसाद पीटर यांनी दीपप्रज्वलनाने केले. शिक्षणासोबतच खेळ आणि कला क्षेत्रात प्रावीण्य मिळवून विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन डॉ. ज्योती भट्ट, दीक्षा शुक्ला आणि प्रसाद पीटर यांनी केले.
प्रसाद पीटर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शुभम हिरेमठ याला ‘उत्कृष्ट विद्यार्थी’ तर श्रावणी बडिगेर हिला ‘उत्कृष्ट विद्यार्थिनी’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
गेल्या वर्षीच्या दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल कुमारी भूमिका यादव हिचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विविध गाण्यांवरील नृत्याविष्कार हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. शिक्षिका पंकजा हुलीकवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सृष्टी कडाडी यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धगौडा सुनगार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments