ARREST

बेळगावात पोलिसांची धडक कारवाई चौघांना अटक

Share

बेळगाव शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या २४ तासांत शहरातील विविध भागात छापे टाकून गांजा सेवन, मटका जुगार आणि प्राणघातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली.

बेळगाव शहरातील खडेबाजार आणि माळमारुती पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पाटील माळ गल्लीत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या आणि संशयास्पद वर्तन करणाऱ्या शास्त्री नगरमधील उत्कर्ष वर्मा याला गांजा सेवन केल्याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी अटक केली.

अशोक नगर हायवे अंडरपास जवळ तलवारीसह फिरून लोकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या फारुख रेहमान याला माळमारुती पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्याकडील तीक्ष्ण शस्त्र जप्त केले आहे.

जुगाराविरोधातील मोहीम तीव्र करत मार्केट पोलिसांनी खंजार गल्लीत छापा टाकून मटका खेळणाऱ्या रियाज पिवाले आणि अशोक जाधव यांना ताब्यात घेतले. जुगाराची रक्कम स्वीकारणारा संशयित फहीम कोतवाल याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएसआय चिन्नस्वामी, पीएसआय होन्नप्पा तलवार आणि विठ्ठल हावन्नवर यांच्या पथकाने ही कामगिरी केली असून पोलीस आयुक्तांनी या पथकाचे कौतुक केले आहे.

Tags: