Bagalkot

इळकल शहरात घरफोड्या करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ

Share

बागलकोट जिल्ह्यातील इळकल मधील विद्यागिरी भागात पाच जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने घातक शस्त्रांसह शिरकाव करत धुमाकूळ घालत नागरिकांची झोप उडवली आहे. विरोध करणाऱ्या नागरिकांवर हल्ला चढवल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

इळकल शहरात रात्रीच्या वेळी पाच जणांच्या टोळीने अक्षरशः थरार निर्माण केला. विद्यागिरी भागातील सुमारे ६ हून अधिक घरे आणि एका चिप्स फॅक्टरीला या टोळीने लक्ष्य केले होते. घरफोडीचा प्रयत्न करत असताना बाहेर आलेल्या रहिवाशांनी विचारणा केली असता, या नराधमांनी त्यांच्यावर दगडफेक करून जीवघेणा हल्ला केला. हातात लाठी-काठ्या आणि घातक शस्त्रे घेऊन ही टोळी रस्त्यावरून फिरत असल्याचे दृश्य स्थानिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

दरोड्याच्या तयारीत असतानाच गस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र अंधाराचा फायदा घेऊन ही टोळी फरार झाली. सध्या इळकल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. शहरात अशा घटना वारंवार घडत असल्याने संतप्त नागरिकांनी आरोपींना तात्काळ अटक करून कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली आहे.

Tags: