विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर शहराजवळ सिमेंटवाहू ट्रक आणि दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बबलेश्वर शहराच्या बाहेरील विजापूर-जमखंडी रस्त्यावर सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने दोन दुचाकींना समोरासमोर धडक दिली. या भीषण धडकेत एका दुचाकीवरील काशिनाथ बिदरी (४३) आणि सतीश शिंदे (३८) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. हे दोन्ही मृतक विजापूर शहरातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दुसऱ्या दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, दुचाकींना धडक दिल्यानंतर सिमेंटचा ट्रक रस्त्यावरच उलटला. घटनेची माहिती मिळताच बबलेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी बबलेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


Recent Comments