Khanapur

पुद्दुचेरीत डॉ. अंजली निंबाळकर यांचे संघटनात्मक मार्गदर्शन

Share

एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी पुद्दुचेरी येथे भ्रष्टाचाराविरोधात काढण्यात आलेल्या पदयात्रेत सहभाग नोंदवला. आगामी तमिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीतही त्यांनी संघटनात्मक धोरणांवर चर्चा केली.

पुद्दुचेरीला भ्रष्टाचारमुक्त करण्याच्या संकल्पासह काँग्रेसने आयोजित केलेल्या भव्य पदयात्रेत डॉ. अंजली निंबाळकर सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी केंद्र आणि स्थानिक सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पदयात्रेदरम्यान त्यांनी जनतेशी संवाद साधून काँग्रेसच्या जनहितकारी धोरणांची माहिती दिली.

तसेच, आगामी तमिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी आयोजित आढावा बैठकीत त्या उपस्थित होत्या. एआयसीसी संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत निंबाळकर यांनी बूथ स्तरावर पक्ष बळकट करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. निवडणुकीची रणनीती आणि पक्ष संघटनेत नवा उत्साह भरण्याबाबत त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

Tags: