अखिल भारतीय वीरशैव महासभेतर्फे शिवबसव नगर येथील लिंगायत भवनमध्ये ‘अमावस्या अनुभव संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी बोलताना निवृत्त प्राचार्या डॉ. सरस्वती कळसद यांनी बसवण्णांच्या वचनांमधील सामाजिक न्याय आणि दैवी अनुभूतीचा वारसा अधोरेखित केला. बाराव्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक क्रांतीची आजच्या काळात गरज असून, शरणांनी दिलेली समतेची शिकवण आचरणात आणल्यासच समाज एकसंध राहील, असे मत डॉ. सरस्वती कळसद यांनी व्यक्त केले.
वीरशैव महासभेच्या जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन केले. महासभेतर्फे चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी यावेळी लिंगदीक्षा पद्धतीचे विशेष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
कारंजीमठचे पूज्य गुरुसिद्ध महास्वामीजी यांनी यावेळी उपस्थितांना आशिर्वचन दिले. परदेशात नोकरी करण्यापेक्षा आपल्या प्रतिभेचा वापर देशसेवेसाठी करावा आणि कौटुंबिक नातेसंबंध जपण्याला प्राधान्य द्यावे, अशी शिकवण गुरुसिद्ध महास्वामीजी यांनी दिली.
या कार्यक्रमाची सुरुवात अनिता मालगत्ती यांच्या वचन प्रार्थनेने झाली. सुधा पाटील यांनी स्वागत केले, तर मंजुश्री हावण्णवर यांनी वचनांचे विश्लेषण सादर केले. याप्रसंगी डॉ. एफ. व्ही. मानवी, डॉ. गुरुदेवी हुलेप्पनवरमठ यांच्यासह महासभेचे सर्व पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments