Belagavi

अगसगा येथे विविध विकासकामांना प्रारंभ

Share

बेळगाव जिल्ह्यातील कडोली जिल्हा पंचायत व्याप्तीमधील अगसगा गावात मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीतून मराठी आणि कन्नड प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या कॉलम भरणी कामाचा आज शुभारंभ करण्यात आला.

कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जารकीहोळी, चिक्कोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी आणि युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली अगसगा येथील सरकारी शाळेच्या नवीन इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. सुमारे ३ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारी ही शाळा मराठी आणि कन्नड अशा दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी सोयीची ठरणार असून, आज इमारतीच्या बांधकामातील महत्त्वाच्या टप्प्याला प्रारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमात मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आणि केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी उपस्थित राहून कामाच्या दर्जेदार पूर्ततेची अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष अमृत मुद्देन्नवर, सदस्य अप्पीगौडा पाटील, गुंडू कुरान यांच्यासह शाळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षक वृंद आणि गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. गावातील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ही शाळा लवकरच लोकार्पण केली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Tags: