Belagavi

राष्ट्रीय फेरीवाला दिनानिमित्त बेळगावात फेरीवाल्यांची रॅली

Share

‘कर्नाटक प्रदेश फेरीवाला महासंघा’च्या सहयोगातून राष्ट्रीय फेरीवाला दिनानिमित्त आज बेळगाव शहरात फेरीवाल्यांच्या वतीने भव्य मेळावा आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील बाजारपेठेतून या रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये वीरगासे पथकासह विविध स्थानिक कलापथके सहभागी झाली होती. राणी चन्नम्मा चौकामार्गे ही रॅली कुमार गंधर्व रंगमंदिरात पोहोचली आणि तिथे मेळाव्याची सुरुवात झाली.

यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सी. ई. रंगस्वामी म्हणाले की, “फेरीवाल्यांच्या भविष्यातील सुधारणा आणि सुरक्षेसाठी हे व्यासपीठ अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर फेरीवाल्यांना आज सन्मानाचे स्थान मिळत आहे.” तर राज्यात १० लाखांहून अधिक फेरीवाले असून त्यांच्यासाठी विशेष कायदा करण्यात आल्याची माहिती अनंतकुमार ब्याकोड यांनी दिली.

या मेळाव्याला कव्यश्री, पवाडेप्पा चलवादी, जाफर मुल्ला यांच्यासह जिल्हाभरातील फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: