खानापूर तालुक्यातील नंदगड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नंदगड आणि आसपासच्या गावांमध्ये वाळू माफियांचा सुळसुळाट वाढला होता. काही प्रभावी व्यक्तींच्या पाठबळावर ही तस्करी सुरू असल्याची चर्चा परिसरात होती. मात्र, सार्वजनिक तक्रारी आणि गुप्त माहितीच्या आधारे नंदगड पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
या छाप्यात पोलिसांनी वाळूने भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून, अवैध व्यवसायात गुंतलेल्यांना कडक इशारा दिला आहे. सध्या पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.


Recent Comments