Belagavi

मुख्यमंत्री बदलाची चर्चा करणे म्हणजे अक्षम्य अपराध; लक्ष्मी हेब्बाळकर

Share

बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चेवर कडक भूमिका मांडत मुख्यमंत्री बदलाचा विषय हायकमांडकडे प्रलंबित असताना, राज्य पातळीवर यावर भाष्य करणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील राजकीय घडामोडींवर बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, “मुख्यमंत्री बदलाबाबतची कोणतीही चर्चा केवळ दिल्लीत व्हायला हवी. राज्यात उघडपणे यावर बोलणे हा अक्षम्य अपराध आहे.” हायकमांडचा आदेश पाळणे हे सर्वांचे कर्तव्य असून, आमदारांच्या परदेश दौऱ्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डी.के. शिवकुमार आणि चन्नराज हट्टीहोळी यांची विधाने ही त्यांची वैयक्तिक मते असू शकतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

बेळगाव तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून, या तालुक्याचे ‘बेळगाव ग्रामीण तालुका’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. हिरेबागेवाडी येथे सुसज्ज बसस्थानक उभारणार असल्याचे सांगतानाच, वैभव नगरमधील पाणी टंचाईचा प्रश्नही त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Tags: