विजापूर जिल्ह्यातील ताळीकोटे तालुक्यातील वनहळ्ळी गावात कालव्यात पोहायला गेलेल्या एका २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने शिवकुमार चेटेरी हा तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे.

विजापूर जिल्ह्यातील वनहळ्ळी येथे दोन तरुण कालव्यात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा वेग जास्त असल्याने शिवकुमार चेटेरी हा प्रवाहासोबत वाहून गेला, तर त्याच्यासोबत असलेला दुसरा मित्र जवळच असलेल्या पाईपच्या साहाय्याने काठावर आल्याने बचावला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कालव्यातील पाण्याचा विसर्ग कमी करून शिवकुमारचा शोध घेतला आणि त्याचा मृतदेह बाहेर काढला.
याप्रकरणी ताळीकोटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पोहायला गेलेल्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.


Recent Comments