खानापूर तालुक्यातील नंदगड येथील जनता कॉलनीतील रहिवासी सुरेश देमाण्णा वड्डर (वय ४२) हे ५ डिसेंबरपासून बेपत्ता झाले आहेत.

सकाळी ६ वाजेच्या सुमारास खानापूरला जातो असे सांगून ते घरून बाहेर पडले होते, मात्र ते अद्याप घरी परतलेले नाहीत. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ते मिळून आलेले नाहीत.
या व्यक्तीबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास नंदगड पोलीस ठाण्याच्या ०८३३६/२३६६३३ किंवा ९४८०८०४०८७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments