मोबाईल घेऊन देण्यास पालकांनी नकार दिल्याने दहावीत शिकणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. निपाणी तालुक्यातील सिद्धनाळ गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

ऋतेश विजय नलवडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो अक्कोळ येथील हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता. ऋतेशने पालकांकडे मोबाईलची मागणी केली होती, मात्र दहावीची परीक्षा संपल्यानंतर मोबाईल घेऊन देऊ असे पालकांनी त्याला समजावले होते. याच कारणावरून ऋतेश नाराज होता आणि घरात कोणी नसताना त्याने आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक एम. एस. सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ऋतेश नलवडे याने मोबाईलसाठी असे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


Recent Comments