बेळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयातील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आजपासून तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन नागनूर रुद्राक्षी मठाचे श्री डॉ. अल्लमप्रभु महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले.


बेळगाव पोलीस हेडक्वार्टरमध्ये श्री वीरभद्रेश्वर यात्रा महोत्सव आज, शनिवारपासून दिमाखात सुरू झाला आहे. सकाळी ११ वाजता श्री डॉ. अल्लमप्रभु महास्वामीजींनी यात्रेला अधिकृत सुरुवात केली. १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या या उत्सवात जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना नागनूर रुद्राक्षी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी म्हणाले की, यात्रा महोत्सवानिमित्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मानवाचा अंतकाळ येतो तेव्हा तो सोबत काहीही घेऊन जात नाही, सोबत राहते ते केवळ त्याचे नाव. त्यामुळे लोकांच्या मनात कायम राहील असे सत्कर्म करा, असे आवाहन त्यांनी केले.
यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला रथोत्सव आणि पालखी सोहळा उद्या, १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर पार पडणार आहे. सकाळी रुद्राभिषेकानंतर पालखी कपिलेश्वर मंदिराकडे मार्गस्थ होईल आणि पुन्हा मंदिरात परतेल. सायंकाळी ५ वाजता मंदिरापासून रथोत्सवाला सुरुवात होईल. हा रथोत्सव संगोळी रायण्णा चौक आणि जुन्या पी.बी. रोडवरून मार्गस्थ होऊन पुन्हा मंदिराकडे पोहोचेल. या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे.


Recent Comments