Belagavi

आरएसएस शताब्दी वर्ष: बेळगावात हिंदू शक्तीचा जागर; भव्य बाईक रॅलीने शहर भगवेमय

Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक निमित्ताने देशभर हिंदू शक्ती जागृत होत आहे. १७ फेब्रुवारी रोजी बेळगावमध्ये होणाऱ्या भव्य हिंदू संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी आज बेळगावच्या गल्लीगल्लीत भव्य बाईक रॅली काढण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त देशातील सुमारे १ लाखांहून अधिक ठिकाणी भव्य हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून बेळगावमधील संयुक्त महाराष्ट्र चौक येथे १७ फेब्रुवारी रोजी मोठे संमेलन होणार असून, त्याबाबत जनजागृती करण्यासाठी आज शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त महाराष्ट्र चौकात हिंदू धर्माचे प्रतीक असलेल्या ‘गरुड ध्वजा’चे आरोहण करून रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘हिंदू राष्ट्र की जय’ अशा घोषणांनी ही रॅली पुढे मार्गस्थ झाली.

यावेळी बोलताना संघाचे प्रमुख किरण जाधव यांनी १७ तारखेला होणाऱ्या संमेलनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून हिंदू समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. किरण जाधव यांनी ही प्रतिक्रिया दिली.

शेकडो दुचाकींसह निघालेल्या कार्यकर्त्यांच्या जयघोषाने बेळगाव शहर दुमदुमले होते. संयुक्त महाराष्ट्र चौकातून निघालेली ही रॅली राणी चन्नम्मा चौकात पोहोचल्यानंतर तिची सांगता झाली.

Tags: