बेळगाव जिल्हा सशस्त्र राखीव पोलीस दलाच्या आवारात श्री वीरभद्रेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त उद्या एक ऐतिहासिक नाटक सादर केले जाणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनीच एकत्र येऊन स्थापन केलेला हा नाट्य संघ आपल्या १०० व्या नाटकाचा प्रयोग रंगमंचावर सादर करणार आहेत.

बेळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयातील श्री वीरभद्रेश्वर मंदिराच्या यात्रा महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांना शानदार सुरुवात झाली आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे १५ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या डी. आर. पूजारी लिखित या नाटकाचा श्री वीरभद्रेश्वर नाट्य संघाच्या माध्यमातून १०० वा प्रयोग होत आहे. विशेष म्हणजे पोलीस मुख्यालयातील कर्मचारीच या नाटकात भूमिका साकारणार आहेत.

याबाबत माहिती देताना निवृत्त पोलीस अधिकारी एच. बी. नरगुंद म्हणाले की, बेळगावच्या कलाक्षेत्रात पोलीस नाट्य संघाने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. १०० व्या नाटकाचा हा मैलाचा दगड गाठल्याबद्दल सर्वांनी प्रोत्साहन देऊन कलाकारांना दाद द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या कलावैभवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासोबतच १६ फेब्रुवारी रोजी पोलीस मनोरंजन कार्यक्रम होणार असून यंदा लहान मुलांनाही आपली प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.


Recent Comments