राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा आज वाढदिवस असून बेळगावमधील त्यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच चाहत्यांनी आणि मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.



लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण बेळगाव शहरात उत्साहाचे वातावरण आहे. विविध जिल्ह्यांतील नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन सदिच्छा व्यक्त केल्या.


चाहत्यांच्या या उदंड प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मंत्र्यांनी सोशल मीडियावरून संदेश दिला आहे. “माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या बेळगावसह संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते. तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव असेच राहू द्या,” असे म्हणत त्यांनी असंख्य चाहत्यांची कृतज्ञताही व्यक्त केली आहे.



Recent Comments