बागलकोट जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांसाठी वरदान ठरणारा ‘हायटेक डेअरी’ प्रकल्प सध्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे रेंगाळला आहे. २०१३ मध्ये सुरू झालेले हे काम ११ वर्षे उलटूनही अपूर्ण असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यातील दूध उत्पादकांना आधार देणारी ही हायटेक डेअरी गेल्या दशकाहून अधिक काळ निधीच्या प्रतीक्षेत आहे. २०१३ मध्ये सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना या डेअरीसाठी असलेला २८ कोटींचा निधी चामराजनगरला वळवण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे बागलकोटमधील काम थांबले असून अधिकारी आणि कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे प्रकल्प संकटात सापडला आहे.

कंत्राटदाराने आतापर्यंत ८ कोटी रुपये घेऊनही केवळ ६० टक्केच काम पूर्ण केले आहे. मशिनरीसाठी १२ कोटी रुपये खर्च झाले असले तरी डेअरी अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. बागलकोट-विजापूर दूध संघाने ७ कोटी रुपये दिले तरी उर्वरित सरकारी निधी अद्याप मिळालेला नाही. आता दूध संघाने स्वतः काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असले तरी, प्रत्यक्ष डेअरी कधी सुरू होणार असा प्रश्न जनता विचारत आहे.



Recent Comments