बेळगावच्या शनिवार खुट परिसरात रस्त्यावर पडलेले सोने परत करून दोन व्यक्तींनी माणुसकी जपली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने मालकिणीचा शोध घेणाऱ्या खडेबाजार पोलिसांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

वैभवनगरचे रहिवासी नागप्पा बेविनमरद आणि रिक्षाचालक हनुमंत किळकेतर यांना रस्त्यावर मंगळसूत्र सापडले. त्यांनी तातडीने खडेबाजार पोलीस ठाणे गाठून हे दागिने पोलिसांकडे सुपूर्द केले. आजच्या काळातही नागप्पा आणि हनुमंत यांनी दाखविलेला हा प्रामाणिकपणा समाजासाठी आदर्श ठरला आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, हे दागिने बैलहोंगल तालुक्यातील चचडी येथील भाजी विक्रेत्या बसव्वा कुरबर यांचे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी बसव्वा यांना तातडीने पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर नागप्पा बेविनमरद आणि हनुमंत किळकेतर यांच्या हस्ते हे मंगळसूत्र त्यांना सन्मानाने परत करण्यात आले. या दोघांच्या प्रामाणिकपणाचे आणि पोलिसांच्या तत्परतेचे पोलीस आयुक्तांनी विशेष कौतुक केले.


Recent Comments