बेळगाव पोलीस मुख्यालयात नवीन निवासस्थानांच्या कामाला आमदार आसीफ सेठ यांनी सुरुवात केली आहे. वर्षभरात हे काम पूर्ण करून सदनिका पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.


बेळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयात ‘पोलीस गृह २०२५’ योजनेअंतर्गत २२१ लाख रुपये खर्चून ६ पोलीस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचे भूमिपूजन आमदार आसीफ सेठ यांच्या हस्ते संपन्न झाले.

बेळगाव पोलीस मुख्यालयात ‘ग्राउंड प्लस २’ इमारतीमध्ये ६ सदनिकांचे बांधकाम केले जाणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी ही घरे अत्यावश्यक असून, वर्षभरात ताबा देण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यानंतर लवकरच दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती आसीफ सेठ यांनी दिली.

पोलीस दलाच्या वसाहतींसाठी आमदारांनी दाखविलेल्या तत्परतेचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी स्वागत केले.
या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments