धारवाडच्या सर्व्हे विभागाचे सुपरवायझर सोमलिंगप्पा यांच्यावर गुरुवारी पहाटे लोकायुक्त पोलिसांनी धाड टाकली आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याच्या आरोपावरून ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

सोमलिंगप्पा यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर धारवाडमधील ‘आइस गेट’ जवळील सर्व्हे विभाग कार्यालय आणि भारतीनगर येथील त्यांच्या निवासस्थानावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. याशिवाय बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड येथील त्यांच्या मूळ घरावरही लोकायुक्तांच्या पथकाने धडक दिली आहे.

लोकायुक्त एसपी सिद्धलिंगप्पा यांच्या नेतृत्वाखाली एकूण चार ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात आली. या कारवाईत मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली असून त्यांची कसून तपासणी सुरू आहे. या धाडीमुळे सरकारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


Recent Comments