Bagalkot

बागलकोटमध्ये विणकराच्या घरी विजयेंद्र यांनी घेतला भोजनाचा आस्वाद

Share

बागलकोट जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी आज बनहट्टी येथील एका सामान्य विणकर कुटुंबाच्या घरी भेट देऊन साधेपणाचे दर्शन घडवले. विणकराच्या घरात जमिनीवर बसून पारंपारिक जेवणाचा आस्वाद घेत त्यांनी समाजाच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

बनहट्टी येथील शांतवीर या विणकराच्या निवासस्थानी बी.वाय. विजयेंद्र यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी विणकर कुटुंबासोबत जमिनीवर बसून विविध पक्वान्नांचा आस्वाद घेतला. अत्यंत घरगुती वातावरणात विजयेंद्र यांनी या भोजनाचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले.

भोजनादरम्यान बी.वाय. विजयेंद्र यांनी विणकाम व्यवसायातील अडचणी आणि बाजारपेठेतील समस्यांबाबत कुटुंबाशी सविस्तर चर्चा केली. विणकर समाजाच्या प्रश्नांवर आपण सरकार दरबारी आवाज उठवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Tags: