बेळगाव शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी एकाच दिवसात विविध ठिकाणी कारवाया केल्या आहेत. सीसीबी आणि स्थानिक पोलिसांनी दुचाकी चोर, मटका बुकी आणि अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या एकूण ६ जणांना अटक केली आहे.

बेळगाव सीसीबी पोलिसांनी शहरात दुचाकींची चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. रजत शिवणगेकर आणि विठ्ठल आरेर अशी या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून १.२० लाख रुपये किमतीच्या ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. एपीएमसी आणि मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत या चोऱ्या झाल्या होत्या. पीएसआय मंजुनाथ भजंत्री यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

दुसरीकडे, शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये शुभम कन्नुकले, मिलिंद सुतार यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच, टिळकवाडी येथील इंद्रप्रस्थ नगरमध्ये गांजा सेवन करणाऱ्या विराज कांग्राळकर आणि सुनील असलकर या दोन तरुणांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या सर्व सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


Recent Comments