Belagavi

बेळगावच्या दोन खेळाडूंची दुबईतील आंतरराष्ट्रीय डब्ल्यूकेएफ युथ लीगसाठी निवड

Share

जागतिक स्तरावरील सर्वोच्च संस्था असलेल्या वर्ल्ड कराटे फेडरेशनद्वारे आयोजित प्रतिष्ठित ‘युथ लीग’साठी बेळगावच्या बेळगाव जिल्हा कराटे असोसिएशनच्या दोन प्रतिभावान खेळाडूंची निवड झाली आहे.


जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अधिकृत ‘डब्ल्यूकेएफ’ युथ लीगसाठी दोन खेळाडूंची निवड झाली असून ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर आणि सचिव जितेंद्र काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगावच्या खेळाडूंनी ही ऐतिहासिक मजल मारली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणे हे असोसिएशनचे मुख्य ध्येय असल्याचे या यशातून स्पष्ट होत आहे.

या स्पर्धेसाठी १४ वर्षांखालील कुमिते +५० किलो वजनी गटात अनुश्री बेबळगी हिची निवड झाली आहे. तर १७ वर्षांखालील ‘काता’ विभागात संस्कृती काकतकर बेळगावचे प्रतिनिधित्व करणार आहे. जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी या दोन्ही खेळाडू सज्ज झाल्या असून त्यांच्या या निवडीबद्दल क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Tags: