Vijayapura

अपघातात मुलगा गमावलेल्या कुटुंबाने केले मुलाचे देहदान

Share

विजापूरमध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बलराम बागलकोट यांचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या पालकांनी वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान करण्याचा निर्णय घेतला.

विजापूरमधील हनुमानगिरी परिसरात काल झालेल्या एका भीषण अपघातात बलराम बागलकोट हे गंभीर जखमी झाले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना तातडीने बीएलडीई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा कोणताही उपयोग झाला नाही आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बलराम यांच्या मृत्यूनंतर बागलकोट कुटुंबाने त्यांचे पार्थिव बीएलडीई वैद्यकीय महाविद्यालयाला दान केले. स्वतःच्या मुलाच्या निधनाचे अतीव दुःख असतानाही केवळ इतरांच्या उपयोगासाठी देहदान करून या कुटुंबाने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये देहदानाबाबत मोठी जनजागृती झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

Tags: