Belagavi

बेळगावात ‘मॅग्नेटा’ची हवा; टिळकवाडीत तिसऱ्या ‘मॅग कॅफे’चे दिमाखदार उद्घाटन

Share

बेळगाव शहराचा लोकप्रिय आयस्क्रीम ब्रँड ‘मॅग्नेटा’ने आपल्या व्यवसायाचा विस्तार केला असून, सोमवारी संध्याकाळी टिळकवाडी येथे तिसऱ्या ‘मॅग कॅफे’ शाखेचे भव्य उद्घाटन करण्यात आले. यामुळे बेळगावकरांना आता खास कॉफी आणि आयस्क्रीमचा एकत्रित आनंद घेता येणार आहे.

बेळगावमधील टिळकवाडीतील मंगळवार पेठ येथील ‘मधुकमल एटरनिया’ इमारतीत हा सोहळा पार पडला. यावेळी उद्योजक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य अतिथी म्हणून माजी आमदार संजय पाटील आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी फित कापून या नवीन शाखेचे विधिवत उद्घाटन केले. शशी सिद्नाळ फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक शशिकांत सिद्नाळ, इंद्रजीत सिद्नाळ आणि वाणी सिद्नाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

मॅग्नेटा आयस्क्रीम हे १०० टक्के शुद्ध दुधापासून बनवले जाते, जे आरोग्यासाठी उत्तम आहे. माजी खासदार सिद्नाळ यांचे नातू दिग्विजय सिद्नाळ हे राजकारण आणि उद्योग अशा दोन्ही क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. या कॅफेची रचना अत्यंत सुंदर असून बेळगावकरांनी या चवीचा आस्वाद नक्की घ्यावा, असे आवाहन माजी आमदार संजय पाटील यांनी केले.

सिद्धनाळ यांच्या नेतृत्वाखालील मॅग्नेटाची उत्पादने अतिशय चविष्ट आणि वेगळी असून ती लोकांच्या पसंतीस उतरतील. आता सुरू झालेल्या कॅफेमध्ये कॉफीसोबत विविध पदार्थांची मेजवानी ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल, अशी प्रतिक्रिया डीसीपी नारायण बरमणी यांनी व्यक्त केली.

आमची ही तिसरी शाखा असून येथे आयस्क्रीम, कँडीज, फालुदा, गडबड यांसारख्या पदार्थांसह कॉफीचा आनंदही घेता येईल. आम्ही कोणत्याही तेलाचा वापर न करता शुद्ध दुधापासून हा बेळगावचा ब्रँड तयार केला आहे, असे संस्थापक दिग्विजय सिद्नाळ यांनी सांगितले.

मी आणि माझ्या दोन भावांनी मिळून हा तिसरा कॅफे सुरू केला आहे. येथे कॉफी, डेझर्ट्स, डोनट्स यांसारखे अनेक प्रकार उपलब्ध असून बेळगावकर याला नक्कीच प्रतिसाद देतील, असा विश्वास वैभवी सिद्नाळ यांनी व्यक्त केला.

मॅग्नेटा आयस्क्रीम हे १०० टक्के शुद्ध आणि शाकाहारी आहे. ग्राहकांना सर्वोत्तम आणि आकर्षक सेवा देणे हेच आमचे ध्येय असल्याचे शशिकांत सिद्नाळ यांनी स्पष्ट केले.

Tags: