Dharwad

धारवाडच्या जिल्हाधिकारी दिव्या प्रभू यांची बदली

Share

धारवाडच्या जिल्हाधिकारी दिव्या प्रभू यांची राज्य सरकारने बदली केली असून, त्यांच्या जागी नूतन जिल्हाधिकारी म्हणून आर स्नेहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलीसंदर्भात सरकारने अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत.

यापूर्वी धारवाड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कर्तव्य बजावलेल्या आर स्नेहल आता जिल्हाधिकारी म्हणून धारवाडची जबाबदारी सांभाळणार आहेत. आर स्नेहल यांनी २०१३ च्या यूपीएससी परीक्षेत देशात ४१० वा क्रमांक पटकावला होता.

कर्नाटक कॅडरच्या २०१४ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या आर स्नेहल यांनी यापूर्वी शासनाच्या विविध महत्त्वाच्या विभागांत कार्य केले आहे. मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त असलेल्या स्नेहल यांनी कर्नाटक राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानाच्या संचालक म्हणूनही काम पाहिले असून, आता त्यांची नियुक्ती थेट धारवाडच्या जिल्हाधिकारी पदी करण्यात आली आहे.

Tags: