बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कडक सूचना दिल्या आहेत.
पोलीस अधीक्षकांनी मद्यपान करून वाहन चालवणे, ट्रॅक्टरमध्ये कर्कश आवाजात गाणी लावणे आणि ग्रामीण भागातील किराणा दुकानांत होणारी अवैध दारू विक्री रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. या मोहिमेमुळे गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी दंड आणि शिक्षेची कारवाई करण्यात आली आहे.
मात्र, दुसरीकडे बेळगाव शहरात अजूनही अल्पवयीन शालेय विद्यार्थी विनापरवाना आणि ‘ट्रिपल सीट’ दुचाकी चालवताना दिसत आहेत. या बेशिस्त मुलांच्या पालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.


Recent Comments