Hukkeri

मुस्लिम कुटुंबाने जपली माणुसकी; अनाथ हिंदू मुलाचे हिंदू पद्धतीने लावून दिले लग्न

Share

हुक्केरी तालुक्यातील बस्तवाड गावात माणुसकी आणि धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडवणारी एक दुर्मिळ घटना समोर आली आहे. एका मुस्लिम दाम्पत्याने दोन अनाथ हिंदू मुलांचा सांभाळ करून, त्यातील मोठ्या मुलाचा आता हिंदू धर्माच्या परंपरेनुसार विवाह लावून दिला आहे.

बस्तवाड येथील मेहेबूब हसन नाईकवाडी आणि नूरजहान या मुस्लिम दाम्पत्याने पुजारी कुटुंबातील दोन अनाथ मुलांना मायेची ऊब दिली. आई-वडिलांच्या निधनानंतर ४ वर्षांचा सोमशेखर आणि २ वर्षांचा वसंत हे दोन्ही भाऊ उघड्यावर पडले होते. नाईकवाडी दाम्पत्याने या मुलांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ केला, त्यांना शिक्षण दिले आणि आता सोमशेखरसाठी हिंदू वधू शोधून हिंदू रितीरिवाजाप्रमाणे त्याचा विवाह पार पाडला.

नाईकवाडी कुटुंबाने दाखवलेल्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वतः मुस्लिम असतानाही त्यांनी मुलांचा मूळ धर्म जपून त्यांचा विवाह हिंदू पद्धतीने लावून दिला आणि समाजात जातीय सलोख्याचा एक नवा आदर्श निर्माण केला. या अनोख्या विवाहाची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात असून नाईकवाडी कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tags: