बेळगाव – सीमाप्रश्नी बलिदान दिलेल्या शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे आज रविवारी सकाळी शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने गांभीर्याने पार पडला.

सम्राट अशोक चौक रामलिंग खिंड गल्ली येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवसेना हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र पुष्पहार वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर,खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, म.ए.समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, माजी नगरसेवक नेताजी जाधव,अंकुश केसरकर, श्रीकांत कदम,दिलीप बैलूरकर आदींसह बहुसंख्य समिती कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.


Recent Comments