बेळगावच्या कॅम्प पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत एका सराईत चोराला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे १ लाख १८ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोऱ्या करणाऱ्या चोराला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. गणेशपूर येथील गंगानगरचा रहिवासी किशोर परशुराम सिंगनगुडी याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गेल्या २५ ऑक्टोबर रोजी बडाळ अंकलगी येथील वीरेश गणाचारी यांनी दुचाकी चोरीची तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विशेष पथक तयार करून चोराला जेरबंद केले.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. कॅम्प पोलीस निरीक्षक आनंद वनकुद्रे आणि पीएसआय आर. आय. सनदी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. आरोपीकडून बजाज पल्सर, होंडा ॲक्टिव्हा आणि स्प्लेंडर अशा तीन दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती आनंद वनकुद्रे यांनी दिली. पोलीस आयुक्तांनी या यशस्वी कारवाईबद्दल संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.


Recent Comments