Belagavi

बसवण कुडची सरकारी शाळेच्या नूतन खोल्यांचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण

Share

बेळगाव उत्तरचे आमदार आसीफ सेठ यांच्या हस्ते बसवण कुडची येथील सरकारी मराठी शाळेच्या नूतन खोल्यांचे लोकार्पण करण्यात आले. सरकारी शाळांमध्ये दर्जेदार सोयीसुविधा पुरवण्यास आपले प्राधान्य असल्याचे आमदार आसीफ सेठ यांनी यावेळी स्पष्ट केले.

बसवण कुडची येथील सरकारी मराठी शाळेत आयोजित कार्यक्रमात आमदार आसीफ सेठ यांनी नवीन खोल्यांचे उद्घाटन केले. गेल्या वर्षी सुरू झालेले हे काम कोणत्याही विलंबाशिवाय दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्याने मतदारसंघातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. उद्घाटनानंतर आमदारांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. सरकारी शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पोषक वातावरण देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार आसीफ सेठ यांनी सांगितले.

या नवीन खोल्यांमुळे विद्यार्थ्यांना आता हवेशीर आणि प्रशस्त वर्गात शिक्षण घेता येणार आहे. कामातील पारदर्शकता आणि वेगाबद्दल पालकांनी आमदारांचे कौतुक केले. शिक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधा बळकट करून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आमदार आसीफ सेठ प्रयत्नशील असल्याचे यावरून दिसून येते.

Tags: