महेश फाऊंडेशनने एमसीसीएक्ससीएलच्या सहकार्याने सौर ऊर्जेवर आधारित ‘टेक ऑन व्हील्स’ ही फिरती संगणक प्रयोगशाळा सुरू केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील सरकारी शाळांमधील गरजू मुले आणि ग्रामीण तरुणांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.


या उपक्रमाद्वारे बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील ४० सरकारी शाळांमधील ४,८०० विद्यार्थ्यांना तांत्रिक साक्षरता मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. सुविधांपासून वंचित असलेल्या मुलांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवून त्यांचे भविष्य सुधारण्यासाठी ही मोबाईल लॅब मदत करेल.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. यावेळी चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी उपस्थित होत्या. दोन्ही लोकप्रतिनिधींनी फाऊंडेशनच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्याची प्रशंसा केली.

महेश फाऊंडेशन विविध सामाजिक उपक्रमांतून सातत्याने सेवा करत असून ग्रामीण मुलांच्या दारापर्यंत संगणक शिक्षण नेण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी म्हटले. हा उपक्रम यशस्वी होऊन अधिकाधिक मुलांना याचा लाभ मिळावा, अशी सदिच्छा सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.
डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा प्रयत्न आदर्शवत असून यामुळे गरीब विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करता येतील, असे मत खासदार प्रियांका जารकीहोळी यांनी व्यक्त केले. या सुविधेचा मुलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रियांका जारकीहोळी यांनी केले.
या कार्यक्रमाला अधिकारी, स्वयंसेवक आणि महेश फाऊंडेशनचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments