Dharwad

धारवाड : अपघातातील मृत पोलीस हवालदाराच्या कुटुंबाला ७० लाखांची मदत

Share

धारवाड बायपास रस्त्यावर झालेल्या अपघातात प्राण गमावलेले पोलीस हवालदार यल्लाप्पा कुंभार यांच्या कुटुंबाला ७० लाख रुपयांचा विमा धनादेश हस्तांतरित करण्यात आला. पोलीस सॅलरी पॅकेज योजने अंतर्गत ही मोठी मदत मृताच्या वारसांना देण्यात आली आहे.

धारवाड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय संचलनाप्रसंगी दिवंगत यल्लाप्पा कुंभार यांचे वडील मडिवाळप्पा कुंभार यांच्याकडे हा ७० लाख रुपयांचा धनादेश सोपवण्यात आला. बँक ऑफ बडोदा आणि पोलीस विभाग यांच्यातील करारानुसार पोलीस सॅलरी पॅकेज अंतर्गत ही विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक गुंजन आर्या यांच्या हस्ते या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी गुंजन आर्या यांनी यल्लाप्पा कुंभार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत पोलीस दल त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. या प्रसंगी पोलीस विभागाचे अधिकारी आणि बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags: