Belagavi

डॉ. प्रभाकर कोरे यांना ‘पद्यश्री’ने सन्मानित केल्याबद्दल व्ही. सोमण्णांकडून अभिनंदन

Share

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात गेल्या अनेक दशकांपासून क्रांती घडविणारे के.एल.ई. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना केंद्र सरकारने प्रतिष्ठित ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर केला आहे. या आनंदाच्या निमित्ताने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी बेळगाव येथील कोरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आत्मीयतेने अभिनंदन केले.

डॉ. प्रभाकर कोरे यांनी के.एल.ई. संस्थेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानाची दारे उघडी केली असून ग्रामीण भागातील जनतेला जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. डॉ. कोरे यांची ही कामगिरी केवळ बेळगाव जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे उद्गार व्ही. सोमण्णा यांनी काढले.

या भेटीदरम्यान माजी खासदार रमेश कत्ती, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, मुरुघेंद्रगौडा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रभाकर कोरे यांना मिळालेल्या या सन्मानामुळे उत्तर कर्नाटकातील शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: