बैलहोंगल शहरातील शिक्षण क्षेत्राचे आधारस्तंभ पूज्य गंगाधर महास्वामी यांची जयंती आणि महाशिवरात्रीनिमित्त दहा दिवसांच्या भव्य यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

बैलहोंगल येथील शिक्षणप्रेमी पूज्य गंगाधर महास्वामी यांचा ७३ वा जयंती महोत्सव आणि महाशिवरात्रीनिमित्त नीलकंठ महाशिवयोगीश्वर यात्रोत्सव ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. या यात्रोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत दररोज संध्याकाळी उळवी श्री चन्नबसवेश्वर पुराण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रभू नीलकंठ महास्वामी यांनी दिली. उत्सवाच्या सांगता दिनी भव्य महारथोत्सव होणार असून राज्याच्या विविध भागांतील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
यावर्षीच्या यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मुरुसावीर मठाच्या अधिकृत संकेतस्थळाचे होणारे लोकार्पण. धार्मिक विधींसोबतच आधुनिकतेची कास धरत हा सोहळा पार पडणार आहे. विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी यंदाच्या उत्सवात असणार आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रींनी दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत मन असेल तर मार्ग मिळेल असा मोलाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी वेळ वाया न घालवता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊन देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन प्रभू नीलकंठ महास्वामी यांनी केले.


Recent Comments