बेळगावातील श्रीनगर भागात उद्या ६ फेब्रुवारी रोजी भव्य ‘विराट हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हिंदू समाजाचे संघटन आणि संस्कृतीच्या जागृतीसाठी आयोजित या कार्यक्रमाची माहिती संमेलन समितीचे सचिव डॉ. बसवराज भागोजी यांनी दिली आहे.

श्रीनगरमधील साई मंदिरासमोरील मैदानावर हे भव्य संमेलन पार पडणार आहे. बेळगावच्या कारंजीमठचे पूज्य श्री गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात हा सोहळा होईल. ‘युवा ब्रिगेड’चे संस्थापक चक्रवर्ती सुलिबेले हे मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार असून, परिणिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या संमेलनानिमित्त उद्या दुपारी ४ वाजता श्रीनगर सर्कल येथून भव्य शोभायात्रेला प्रारंभ होईल. संमेलनाच्या निमित्ताने महिला आणि मुलांसाठी विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि ओटी भरणे हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असेल, असे डॉ. बसवराज भागोजी यांनी सांगितले.


Recent Comments