Belagavi

​बेळगावात बेडरूममध्ये लपवलेला कॅमेरा जप्त; तिघांना अटक

Share

​बेळगावमधील माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत तंत्रज्ञानाचा गैरवापर करून महिलेचे वैयक्तिक क्षण चित्रित करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी महिलेला धमकावणाऱ्या तीन आरोपींना मार्केट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

​बेळगाव शहरातील माळमारुती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील एका घरात लाईट बल्बच्या होल्डरमध्ये ‘हिडन कॅमेरा’ बसवून हा धक्कादायक प्रकार करण्यात आला. घरात छुप्या पद्धतीने कॅमेरा बसवून आरोपींनी महिलेचे खासगी चित्रण केले होते. त्यानंतर हे व्हिडिओ दाखवून ५० लाख रुपयांची मागणी करत पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर मार्केट पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून समीर शेख, अब्दुल रशीद मकानदार आणि मोहम्मद दिलावर या तिघांना अटक केली, अशी माहिती भूषण बोरसे यांनी दिली.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जनतेने हिडन कॅमेऱ्यांबाबत सावध राहावे आणि अशा कोणत्याही ब्लॅकमेलिंगला बळी न पडता किंवा न घाबरता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन भूषण बोरसे यांनी केले आहे.

Tags: