बेळगावमधील न्यू गुडशेड रोड ५ व्या क्रॉस येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या श्री गणेश मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना महोत्सव अत्यंत वैभवात साजरा होत आहे. या धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

बेळगावच्या न्यू गुडशेड रोड ५ व्या क्रॉस येथील श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला असून, मंदिरात नवीन श्री गणेश मूर्ती, मूषक आणि उत्सव मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यानिमित्त १ फेब्रुवारी रोजी रविवारी दुपारी ठीक ३ वाजता शहापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून गणरायाची भव्य आगमन मिरवणूक निघणार आहे. ही शोभायात्रा विविध मार्गावरून मंदिरात पोहोचणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.
मंदिरातील धार्मिक विधींची सांगता ६ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी होणार आहे. या दिवशी दुपारी १२ वाजता भव्य महाआरती होईल आणि त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. या पवित्र सोहळ्यात बेळगाव आणि परिसरातील गणेशभक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.


Recent Comments