Dharwad

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी ५ फेब्रुवारीला ‘दिल्ली चलो’चा नारा; जंतरमंतरवर देशभरातील शिक्षक धडकणार

Share

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी ५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘दिल्ली चलो’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय शिक्षक संयुक्त कृती समितीच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय शिक्षक फेडरेशनचे अध्यक्ष बसवराज गुरीकार यांनी दिली.

धारवाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बसवराज गुरीकार यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. सेवेत असलेल्या शिक्षकांसाठीची टीईटी परीक्षा रद्द करणे, एनपीएस ऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक-विद्यार्थी विरोधी अटी वगळणे या प्रमुख मागण्यांसाठी हा लढा दिला जाणार आहे. याशिवाय अतिथी शिक्षकांना कायम करणे, देशभरातील रिक्त शिक्षक पदांची भरती, आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आणि विधानपरिषद निवडणुकीत प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार मिळावा, या मागण्यांसाठी सरकारवर दबाव निर्माण केला जाणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या आंदोलनात देशभरातील विविध राज्यांतून शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून केंद्र व राज्य सरकारने या समस्यांची तातडीने दखल घ्यावी, असे बसवराज गुरीकार यांनी म्हटले.

Tags: